Type Here to Get Search Results !

सिन्नर - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा.

 कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा.



 सिन्नर( प्रतिनिधी) सुरेश इंगळे.


 सिन्नर- माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात 1995 सली कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत  यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी आमचे उत्पन्न कमी आहे, आणि आम्हाला दुसरे घर नाही अशा स्वरूपाची खोटी माहिती त्यांनी शासनाला दिली होती, मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते गेल्या अनेक वर्षापासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता. 

न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी दोन वर्षाचा कारावास आणि 50 हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.  आज सत्र न्यायालयाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देत मोठा दिलासा दिला आहे. जोपर्यंत या प्रकरणात सुनावणी सुरू आहे तेव्हापर्यंत कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय नाशिक सत्र न्यायालयाने दिला आहे.