Type Here to Get Search Results !

राहुरी - ब्रह्माकुमारीज च्या वतीने महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

 ब्रह्माकुमारीज च्या वतीने महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वतीने महाशिवरात्री निमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ब्रह्माकुमारीच्या वतीने देण्यात आली.


बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रम संपन्न होणार असून दिनांक २६ रोजी २५ फूट दिव्य श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर लेझर शो द्वारे ईश्वरीय अनुभूती व सहस्त्र शिवलिंग दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. तीन दिवस या लेझर शोचा भाविकांना लाभ घेता येणार आहे.


कार्यक्रमाचे उद्घाटन राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे, माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, तहसीलदार नामदेवराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.


राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, डॉ. सौ. वैशालीताई रोकडे, डॉ. सत्यजित गव्हाणे आदी मान्यवरांसह राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्या उपस्थितीत होणार आहे.


राहुरी नगरपालिकेच्या पाठीमागे ब्रह्माकुमारी, राजयोग भवन येथे संपन्न होणाऱ्या या महाशिवरात्री उत्सवासाठी भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन राहुरी केंद्राच्या  संचालिका ब्रह्माकुमारी नंदा दिदी यांच्या वतीने करण्यात आले आहे.