Type Here to Get Search Results !

सिन्नर - कोर्टाने शिक्षा सुनावून चार दिवस उलटले तरीही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई का नाही?

 कोर्टाने शिक्षा सुनावून चार दिवस उलटले तरीही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई का नाही?



 सिन्नर( प्रतिनिधी) सुरेश इंगळे.


 सिन्नर- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी 1995 मध्ये फसवणूक करत सरकारी घराचा लाभ घेतला, त्यामुळे कोकाटेंच्या मंत्रीपदावरच नाही तर आमदारकीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कोर्टाने या प्रकरणी जामीन मंजूर केला आहे, मात्र शिक्षेवर स्थगिती नाही. त्यामुळे नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द व्हायला हवी होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कारवाई न केल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत.


 विधिमंडळाला पत्र मिळतात माणिकराव कोकाटे यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कारवाई करण्यात येणार आहे. परंतु विधिमंडळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , विधिमंडळ सदस्याला शिक्षा सुनावल्यावर पोलीस किंवा कोर्टाकडून विधिमंडळाला पत्र देण्यात येत असते. परंतु अद्याप  ती प्रत मिळाली नसल्याने विधिमंडळाने कोकाटे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नसली तरी,  प्रत मिळताच विधिमंडळ कोकाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. अशी माहिती सूत्रांनी दिली.


 सत्ताधाऱ्याचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप. 

याआधी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात कोर्टाने शिक्षा ठोठावली होती त्यानंतर लोकसभा सचिवा लायन त्यांची खासदारकी लगेचच रद्द केली होती तसेच सुनील केदार यांनाही कोर्टाने शिक्षा ठोठावताच त्यांची सुद्धा आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली होती मग माणिकराव कोकाटे यांच्याबाबत वेगळं अन्याय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यासाठी वेगळा न्याय कसा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्याचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप विरोधकांनी केला.