Type Here to Get Search Results !

टाकळी ढोकेश्वर - हिमोफिलिया रूग्णांसाठी असणारी घटकाची कमतरता भविष्यकाळात भरून निघेल - डाँ.दत्तात्रय लोडे

 हिमोफिलिया रूग्णांसाठी असणारी घटकाची कमतरता भविष्यकाळात भरून निघेल -  डाँ.दत्तात्रय लोडे

टाकळी ढोकेश्वर




 वृत्तसेवा 

परदेशात ज्या प्रमाणे संशोधनाच्या प्रमाणात वाढ होत आहेत तसेच आपल्या देशातही संशोधन वाढत असून हिमोफिलिया रूग्णांसाठी असणारी घटकाची कमतरता भविष्यकाळात भरून निघेल असे मत जी एस घुणे आर्युवेद काँलेजचे प्राचार्य डाँ.दत्तात्रय लोडे यांनी केले. 

    जी एस घुणे आर्युवेद काँलेज येथे आयोजित हिमोफिलिया कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आर्युवेद हाँस्पिटलचे निवासी वैदयकीय अधिकारी डाँ.समिर होळकर,वैदयकीय अधिकारी डाँ.रूपाली कुलकर्णी,फिजिओथेरपीस्ट डाँ.अमृता गवळी,नगरसेवक रविंद्र बारस्कर,हिमोफिलिया सोसायटी अहमदनगर चँप्टरचे अध्यक्ष दादा भालेकर, इंटास फाऊंडेशनचे सुरज माळी, डाँ.ज्ञानदेव आव्हाड,अरूण पानसंबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डाँ.गोडे म्हणाले की,आज हिमोफिलियामध्ये  परदेशात नवनविन तंत्रज्ञान विकसीत झाले असून त्यावर योग्य अशी चाचणी चालू आहे.त्यामुळे भविष्यकाळात याचा फायदा देशाला नक्की होवून हिमोफिलिया रूग्णांच्या शरिरात जे काही घटकाची कमतरता होती ती नक्कीच भरून निघेल व हिमोफिलिया रूग्णांना   सर्वसामान्यां सारखे जिवन जगता येईल.

    यावेळी डाँ.होळकर म्हणाले की,हिमोफिलिया रूग्णांची वाढती संख्या पाहता आर्युवेदात काही करता येईय का यासाठी जी एस घुणे आर्युवेद हाँस्पिटल सदैव कटीबध्द राहून भविष्यकाळात हिमोफिलियासाठी स्वतंत्र सेंटर चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे.ताण,तणाव मुक्त होवून वेदनामुक्त जिवनासाठी आर्युवेदामध्ये काही करता येईल का यासाठी संशोधन चालू असून हिमोफिलियासाठी फिजिओथेरपी देण्यासाठी आर्युवेद हाँस्पिटल कटीबध्द आहेत.

   याप्रसंगी डाँ.रूपाली कुलकर्णी,रविंद्र बारस्कर यांनी रूग्णांना मार्गदर्शन केले.तर फिजिओथेरपीस्ट डाँ.अमृता गवळी यांनी व्यायामाचे  महत्व विषद केले.

  याप्रसंगी हिमोफिलिया रूग्णांना इंटास फाऊंडेशन च्या वतीने फिजिओथेरपी कीट व इंरजन्शीसाठी फँक्टर वाटप करण्यात आले.

 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दादा भालेकर तर आभार इंटास फाऊंडेशनचे  सुरज माळी यांनी मानले.

फोटो ओळी....

जी एस घुणे आर्युवेद काँलेज येथे हिमोफिलिया रूग्णांना फिजिओथेरपीचे कीट वाटप प्रसंगी डाँ.दत्तात्रय गोडे,डाँ.समिर होऴकर,रविंद्र बारस्कर,डाँ.रूपाली कुलकर्णी,डाँ.अमृता गवळी,डाँ ज्ञानदेव आव्हाड,दादा भालेेकर आदी .