Type Here to Get Search Results !

राहुरी - उंबरेच्या तरुणाची नर्मदा परिक्रमा फेरी, गावकऱ्यांकडून स्वागत.

 उंबरेच्या तरुणाची नर्मदा परिक्रमा फेरी, गावकऱ्यांकडून स्वागत.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील उंबरे येथील श्री अशोक लक्ष्मण ढोकणे या तरुणाने नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आपल्या मूळ गावी सुखरूप आगमन झाल्याबद्दल उंबरे ग्रामस्थांच्या वतीने अशोक ढोकणे यांची भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.


यावेळी गावातील अनेक महिलांनी औक्षण केले. यावेळी डीजेच्या तालासह टाळ मृदंगच्या निनादात अशोक ढोकणे यांची भव्य मिरवणूक करण्यात आली. यावेळी ह भ प घोडके महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होऊन  उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 


गेल्या तीन चार महिन्यापासून अशोक ढोकणे हे नर्मदा परिक्रमासाठी गेले होते. अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवास पूर्ण करून सुखरूप आपल्या घरी आले. यांच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.