जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करायला शिका --श्याम काशीद
रयत शिक्षण संस्थेचे श्री मुक्तादेवी विद्यालय नारोडी येथे गुरुकुल प्रकल्पांतर्गत सेवानिवृत्त मेजर श्याम काशिद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी जीवनात काहीतरी वेगळे करण्यासाठी मनस्वी जिद्द बाळगली पाहिजे, प्रथम देशसेवा नंतर घरच्यांचा विचार करायला शिकले पाहिजे ,जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करायला शिकले पाहिजे असे विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज व सरस्वतीचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यालयातील उपशिक्षक दत्तात्रय भोर यांनी उपस्थितांचे स्वागत व परिचय करून दिला. त्यानंतर योगेश हुले यांनी श्याम काशिद यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुभाष हुले यांनी आपल्या मनोगतात श्याम काशीद यांनी आपल्या जीवनाचा कालावधी भारत मातेच्या सेवेसाठी 22 वर्ष देऊन जीवनात अनेक खडतर चढउतार पाहिलेत मात्र ते डगमगले नाहीत ऊन,वारा, पाऊस याची तमा न बाळगता धैर्याने देशहितासाठी लढले असे मनोगत व्यक्त करून श्याम काशीद यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या .त्यानंतर गणेश हुले यांनी मार्च2000 सालच्या त्यांच्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा दिला.ज्ञानदेव शेवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सरपंच मंगल हुले यांनी भूषविले.तसेच ग्राम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बंगाळ, सोसायटी चेअरमन विलास हुले, रामदास हुले , अमोल विधाटे,संदीप हुले ,सोपानराव हुले,गोरक्ष पिंगळे , निवृत्ती हुले, विशाल घोडेकर, मच्छिंद्र हुले, सुजित पिंगळे, नितीन बोंबले,राजेश हुले, चंद्रभागा हुले,सीमा वाघमारे, सचिन बारसोडे, दशरथ हुले, सदाशिव हुले , निवृत्ती हुले आदी मान्यवर उपस्थित होते सरपंच मंगल हुले यांनी मार्च 2000 सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचेअभिनंदन मानून विद्यार्थ्यांनी देशावर प्रेम करण्यास शिकावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्तात्रय भोर, सुभाष गुंजाळ ,सुनिल कचरे, महेंद्र गायकवाड, वैशाली भामे, सुरेश झांजरे ,मनिषा पिंगळे इत्यादींनी मेहनत घेतली शेवटी सर्व उपस्थितांचे आभार दत्तात्रय भोर यांनी मानले.


