Type Here to Get Search Results !

राहुरी - अज्ञात भामट्यांनी सुमारे २ लाखांची दारु पळवीली.


 


अज्ञात भामट्यांनी सुमारे २ लाखांची दारु पळवीली.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अज्ञात भामट्यांनी देशी दारुचे दुकान फोडून सुमारे दोन लाख रुपयांची बियर व देशी दारुचे बॉक्स चोरुन नेल्याची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. 


राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे साई आरव वाईन ॲन्ड बार नावाचे दारुचे दुकान आहे. त्या दुकानात श्रीराम व्यंकटेश बुरा, वय २३ वर्षे, रा. राहुरी खुर्द, ता. राहुरी, हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. श्रीराम बुरा हे दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले होते. 


त्यानंतर ते दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान दुकान उघडण्यासाठी आले. या दरम्यान अज्ञात भामट्यांनी रात्रीच्या सुमारास दारु दुकानचे शटरचे कुलूप तोडुन दुकानात प्रवेश केला. आणि दुकानातील १ लाख ८६ हजार २४२ रुपए किंमतीचे बियर व देशी दारुचे बाॅक्स चोरुन नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 


श्रीराम व्यंकटेश बुरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. १४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३०५ (अ) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस पथकाकडून सुरु आहे.