Type Here to Get Search Results !

राहुरी - गोटुंबे आखाडा येथे महाशिवरात्र उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने संपन्न.

 गोटुंबे आखाडा येथे महाशिवरात्र उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने संपन्न.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे दरवर्षी चालत आलेल्या महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिके नुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात.


अशाच प्रकारे गोटुंबे आखाडा येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. भागवताचार्य ह.भ.प अंकुश महाराज जगताप यांच्या मधुर वाणीने झाली. या कार्यक्रमाची सुरूवात मंगळवारी विविध मान्यवरांच्या हस्ते तसेच गावकऱ्यांच्या उपस्थित करण्यात आली. 


मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी रात्री 7 ते 9 कीर्तनरूपी सेवा देण्यात आली. तसेच बुधवारी सकाळी 7 ते 8 कावडी मिरवणूक काढण्यात आली. ज्यात सर्व गावकरी व शिवभक्त उपस्थित होते तसेच प्रत्येकाने आपापल्या अंगणात पाण्याचा शिंपडा केलेला होता. महाशिवरात्री च्या दिवशी कावडी घेऊन येणाऱ्यांना व बाकी शिवभक्तांना फराळाचा आस्वाद देण्यात आला. 


तर गुरुवार सकाळी 10 ते 11 काल्याचे कीर्तनाने समारोप करण्यात आला व तद्नंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यामध्ये ज्या ज्या शिवभक्तांनी कार्यक्रमासाठी अन्नदान केले त्या सर्वांचे श्रीफळ व महादेव ची एक फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला.