Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान प्रारंभ.

 शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान प्रारंभ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने व

शिवसेना युवा सेना मा. खा. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचे दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याचे शिव कार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अभियान नोंदणी प्रमुख अजय बोरस्ते तथा शिवसेना उपनेते नाशिक यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर व्हीआयपी गेस्ट हाऊस अहिल्यानगर संभाजीनगर रोड येथे उत्साही व आनंदाच्या वातावरणात असंख्य शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महिला आघाडी जिल्हा पदाधिकारी सर्व महिला सदस्य यांच्या उपस्थितीत आणि शिवसेना अंगीकृत संघटनेच्या सदस्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


कार्यक्रम प्रसंगी शिवसेना अहिल्यानगर शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले. त्याच प्रसंगी जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, दुसरे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, नगरसेवक संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख

डॉ. नजमा इनामदार यांनी सर्वांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांना शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी बद्दल मार्गदर्शन केले.


शेवटी सर्व ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते, ते शिवसेना शिव कार्य सदस्य नोंदणी अभियान प्रमुख अजय बोरस्ते यांनी त्यांच्या मार्गदर्शन पर भाषणातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांना सदस्य नोंदणी अभियानाबद्दल योग्य मार्गदर्शन करून पक्ष वाढीसाठी शिव सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी गावोगावी सदस्य नोंदणी अभियान घेऊन जनतेला शिवसेनेच्या माध्यमातून शासकीय योजनेबाबतीत माहिती देऊन सदस्य नोंदणी करून घ्यावी.


त्यानंतर त्यांना सदस्य नोंदणी झाल्याबद्दल चे आयडेंटी कार्ड देण्यात यावे. सदस्य नोंदणी अभियान प्रमुख अजय बोरस्ते यांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व जिल्हा पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाची सांगता झाली.


त्याच्यानंतर सर्व प्रमुख पाहुणे शिवसैनिक पदाधिकारी यांना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वांनी स्वादिष्ट जेवणाचा स्वाद  घेतला. शेवटी संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.