Type Here to Get Search Results !

श्रीगोंदा - शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पदी मिराताई खेडकें

 शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पदी मिराताई खेडकें



श्रीगोंदा (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळविल्या मुळे महाराष्ट्रात शिंदे शिवसेने मध्ये इन्कमिंग सुरू झाली. श्रीगोंदा तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असून अनेक जण शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

श्रीगोंदा येथील सामाजिक कार्यकर्त्या मिराताई खेडकें यांनीही  गेले दोन तीन महिन्यापासून शिवसेना महिला आघाडी बरोबर पक्षाचे काम करत होत्या.



काल दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पक्षाचे उपनेते अजय बोरस्तेकर सभासद नोंदणी अभियान निरीक्षक म्हणून आहिल्यानगर दौऱ्यावर आले होते.आहिल्यानगर येथील शासकीय विश्राम गृह येथे मिराताई खेडकें यांची  श्रीगोंदा तालुका प्रमुख पदी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिराताई शिंदे यांनी नियुक्ती केली.शिवसेना उपनेते अजय बोरस्तेकर ,जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले,शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव ,जिल्हा प्रमुख डॉ शबनम इनामदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर काम करून घराघरात शिवसेना पक्षाचे ध्येयधोरण पोहचवणार पक्षवाढी साठी काम करणार असल्याचे खेडकें यांनी सांगितले.

त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.