Type Here to Get Search Results !

राहुरी - जागतिक सूर्य नमस्कार दिना निमित्त ३० महिलांचा १०८ सूर्यनमस्कार अभ्यास उपक्रम.


 


जागतिक सूर्य नमस्कार दिना निमित्त ३० महिलांचा १०८ सूर्यनमस्कार अभ्यास उपक्रम.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


विवेकानंद नर्सिंग होमच्या आयुर्वेद महाविद्यालय व त्रिवेणी योगा वर्ग राहुरी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सूर्य नमस्कार दिना निमित्त ३० महिलांनी १०८ सूर्यनमस्कार अभ्यास उपक्रम आज राहुरीतील योगा केद्र येथे संपन्न झाला. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. आयुर्वेद महाविद्यालयातील उप प्राचार्य डॉ. संतोष बांगर यांच्या हस्ते सूर्यनमस्कार घालणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.


जागतिक स्तरावर प्राचीन भारतीय आयुर्वेद व योग शास्त्रातील सूर्यनमस्कार ह्याचे महत्त्व आज आधुनिक काळात जागतिक पातळीवर प्रचार व प्रसार माध्यमातून आणि सूर्य नमस्कारच्या प्रभाव व कार्य शक्तीने अग्रगण्य स्थान प्राप्त केल्यामुळे जागतिक पातळीवर विकसित व विकसनशील देश, सूर्यनमस्कार ह्या क्रियेचा दैनंदिन जीवनात उपयोग करून स्वास्थ आरोग्य राखण्याचा प्रयत्न करीत आहेत.


ह्या संकल्पेतून महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिक्षक डॉक्टरेट अनंतकुमार शेकोकार ह्यांच्या मार्गदर्शन व नियोजन द्वारे राहुरी पंचक्रोशीत विविध सामाजिक उपक्रम आयोजित केल्या जातात तसेच प्राधिकृत अधिकारी देवीदास घोडेचोर  ह्यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहन द्वारे प्रेरित होऊन सुट्टीच्या दिवशी उपप्राचार्य डाँ. संतोष बांगर, स्वस्थ वृत्त विभागाचे प्रमुख वैद्य मंगेश कुंभकर्ण, वैद्य योगेश मंचे तसेच वैद्य सौ. माधुरी कुलकर्णी यांचे या उपक्रमात सहकार्य लाभले. 


योग केंद्राच्या प्रमुख मंजिरी रीसबूड यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. दहा वर्षाच्या बालिका श्रुती कोहकडे, ऋतिका भुजाडी पासून ते साठ वर्षा पर्यंतच्या महिलांचा उपक्रमात सहभाग होता. जागतिक योग दिन, जागतिक ध्यानदिन हे उपक्रमही या त्रिवेणी योग वर्गाद्वारे घेतले जातात.