५० वर्षीय महिलेचा विनयभंग करुन मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तू आमच्या घरी येऊन शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली असता आरोपीने एका ५० वर्षीय महिलेला दगड व लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन तीचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांभेरे परिसरात दि. ३० जानेवारी रोजी घडली.
या घटनेतील पिडीत ५० वर्षीय महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सदर महिला व आरोपी यांचे पाठिमागील कारणावरुन भांडण होत असतात. दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सदर महिला तीच्या घरातील काम आवरत होती.
त्यावेळी तेथे आरोपी आला. तेव्हा सदर महिला त्याला म्हणाली कि, तु तेथे आमच्या घरी घेवून शिवीगाळ का करतो. त्यावेळी त्याने काही एक कारण नसताना त्या महिलेला लाथा बुक्यानी व दगडाने मारहान केली. तसेच त्या महिलेच्या इच्छेविरुध्द नको त्या ठिकाणी स्पर्श केला. आणि तीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
घटने नंतर सदर महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णाजी दत्ताञय बेलकर, रा, तांभेरे, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ६६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ७४, १२५, ११८ (१), ११५ (२), ३५२ प्रमाणे मारहाण व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रविण बागुल हे करीत आहे.
