Type Here to Get Search Results !

राहुरी - सरपंच शोभाताई भनगडे यांची जि.प. नियोजन समिती सदस्यपदी निवड.


 



सरपंच शोभाताई भनगडे यांची जि.प. नियोजन समिती सदस्यपदी निवड.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


जिल्हा परिषदेचा २०२५-२६ या वर्षीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, या आराखड्याच्या नियोजनासाठी स्थापन झालेल्या जिल्हा परिषद नियोजन समितीच्या सदस्यपदी गणेगावच्या सरपंच शोभाताई अमोल भनगडे यांची निवड झाली आहे.


जिल्हा परिषद नियोजन समिती आणि क्षेत्रीय कार्यकारी गटाची स्थापना करण्यात आली असून, समिती मार्फत विभागीय उपक्रमांची प्रगती, खर्च आणि पुढील वर्षासाठी निधी वाटप यावर काम केले जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक सरपंच या समितीत निवडला जातो. राहुरी तालुक्यातून गणेगावच्या सरपंच शोभाताई अमोल भनगडे यांना संधी मिळाली आहे.