अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी तरुणास अटक.
कोणीही आपल्या मुला, मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये- पो. नि. ठेंगे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळून जेरबंद केले.
राहुरी तालुक्यातील मोकळा येथील विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ या आरोपी तरुणाने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटने संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीवर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.
सदरील गुन्ह्यातील आरोपी विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ, वय २४ वर्षे, रा. मोकळ मोहोळ, ता. राहुरी, याला राहुरी पोलिस पथकाने दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज चालू आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.
अशा घटना टाळण्यासाठी राहुरी पोलिसांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की, कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे , गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखार सय्यद, सचिन ताजने आदि पोलिस पथकाने केली.
