Type Here to Get Search Results !

राहुरी - बंद असलेल्या हाॅटेलचे सामान भामट्यांनी पळवीले.

 बंद असलेल्या हाॅटेलचे सामान भामट्यांनी पळवीले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात बंद असलेले जगदंब हाॅटेल अज्ञात भामट्यांनी फोडून हाॅटेलमधील सर्वच सामान चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


अजित रावसाहेब वने, वय २७ वर्षे, रा. गणेगांव, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अजित वने यांनी फॅक्टरी परिसरातील वाणी वाडा येथील संदीप गंगाधर वरखडे यांचे हाॅटेल चालवायला घेतले आहे. शेजारीच त्यांचे जगदंब हाॅटेल असून ते सहा महिन्यांपासून बंद आहे. 


अज्ञात भामट्यांनी सदर बंद असलेले हॉटेलमधील भांड्याचा सेट, गॅस शेगडी, फ्रीज तसेच डिपफ्रीज असे सर्वच साहीत्य चोरुन नेले. चोरी झाल्याचे लक्षात येताच अजित रावसाहेब वने यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ९३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४), ३३१ (५), ३३१ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.