Type Here to Get Search Results !

राहुरी - धाडगे यांचे घर फोडून सोन्याचे दागीने व रोख रक्कम पळवीली.

 धाडगे यांचे घर फोडून सोन्याचे दागीने व रोख रक्कम पळवीली.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे अज्ञात भाट्यांनी बंद घराचे कुलूप तोडुन घरातील दोन तोळे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शिवाजी मारुती धाडगे, वय ६८ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, सरस्वती कॉलनी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शिवाजी धाडगे व त्यांची पत्नी दोघेजण दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या घराला कुलुप बाहेर गावी गेले होते. ते दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी परत घरी आले. 


या दरम्यान अज्ञात भामट्यांनी धाडगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला. घरातील सामानाची उपकापाचक केली. त्यावेळी भामट्यांनी कपाटातील सोन्याची अंगठी, कानातील डूल, रिंगा असे १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, एक मोबाईल व २ हजार रुपए रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आले. 


शिवाजी मारुती धाडगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा रजि. नं. ९२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४), ३३१ (५), ३३१(६) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.