बंद घराचे कुलूप तोडुन घरातील सोने चांदीच्या दागीन्यासह रोख रक्कम पळवीली.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडुन घरातील कपाटातील सुमारे सव्वादोन तोळे सोन्याचे दागीने व चांदीच्या दागीन्यासह रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली.
वर्षा शेखर शेजुळ, वय ३५ वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी, नर्सिंग होम कॉलनी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, वर्षा शेजूळ या सध्या राहुरी खुर्द येथे राहत आहे. त्यांचे राहुरी फॅक्टरी येथील कामगार वसाहतमध्ये घर आहे. अज्ञात भामट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला.
आणि कपाटातील दोन तोळे साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, चांदीचे दागीने तसेच २६ हजार रुपए रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल चोरून नेला. सदर घटना ३ फेब्रुवारी २०२५ रोजी उघडकीस आली. वर्षा शेखर शेजुळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ७६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (६) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
