Type Here to Get Search Results !

राहुरी - सासु सुनेला घरात घुसुन मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.

 सासु सुनेला घरात घुसुन मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत, असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी सासू व सुनेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील उंबरे येथे घडली. 


अनिता विजय बोरकर, वय ३० वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.४५ वा. चे सुमारास अनिता बोरकर व त्यांची सासु उषा अण्णासाहेब बोरकर अशा दोघीजणी त्यांच्या घरात स्वयंपाक करत होत्या. 


त्यावेळी आरोपी बोरकर यांच्या घरात घुसले व म्हणाले की, तुझा नवरा कोठे आहे, असे म्हणुन ते शिवीगाळ करु लागले. त्यावेळी अनिता बोरकर यांची सासु उषा त्यांना म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत. असे म्हणालेचा त्या दोघांना राग आला. त्यांनी दोघींना शिवीगाळ दमदाटी करत हाथाच्या चापटीने मारहाण केली. 


अनिता बोरकर यांच्या गळयातील मनीमंगळसुत्र ओढुन नुकसान केले. तसेच सासु उषा यांच्या गळयातील मणीमंगळसुत्र झटापटीत तुटुन गहाळ झाले आहे. त्यानंतर पुन्हा आमचे नादी लागलातर एका एकाला जिवे ठार मारुन टाकु, अशी आरोपींनी धमकी दिली.


अनिता विजय बोरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब जनार्धन शेळके व राहुल जर्नाधन शेळके, दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३२४ (४), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.