Type Here to Get Search Results !

राहुरी - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात माता रमाई यांचा सिंहाचा वाटा- निलेश जगधने.

 माता रमाई आंबेडकर जयंती ठिक ठिकाणी उत्साहात साजरी.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात माता रमाई यांचा सिंहाचा वाटा- निलेश जगधने.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात सिंहाचा वाटा असलेल्या माता रमाई आंबेडकर यांची आज जयंती. त्या निमित्त राहुरी तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. 


शहरातील नवीपेठ येथील साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे चौक येथे आज दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी भगव्या ग्रुपच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला होता.


या कार्यक्रमा प्रसंगी भगव्या ग्रुपचे राज्य प्रवक्ते निलेश जगधने, अध्यक्ष राजुभाऊ अढागळे, राहुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दशरथ दादा पोपळघट, माजी नगरसेवक गजानन सातभाई, माजी आरोग्य निरीक्षक भास्करराव आल्हाट, वाय एस तनपुरे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब साठे, मयुर दुधाडे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. 


यावेळी भगवा ग्रुपचे राज्य प्रवक्ते यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात माता रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना माता रमाई स्वतः काबाडकष्ट करून डाॅ. बाबासाहेब यांना पैसे पुरवीत होत्या. माता रमाई या त्यागाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून प्रत्यकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया निलेश जगधने यांनी दिली.


याप्रसंगी मयुर दुधाडे, सचिन जगधने, रविंद्र जगधने, दिपक आव्हाड, रमेश जगधने, सागर जगधने, रवि गुंजाळ, पिनु ससाणे आदिसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.