Type Here to Get Search Results !

राहुरी - राहुरी तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द.

 राहुरी तालुक्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द.



मानोरी, वळण, केंदळ कृषी सेवांचा समावेश, अजूनही कृषी सेवा रडारवर.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


कृषी निविष्ठा विक्री केंद्रांमध्ये खतांची लिकिंग (संलग्न विक्री), जादा दराने खते विक्री, विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदी प्रकार निदर्शनास आल्याने राहुरी, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यांतील १२कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.


रणजित आढाव यांचे वळण व केंदळ येथील पांडुरंग कृषी सेवा केंद्र तर मानोरीतील माऊली कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहे. खरीप हंगाम २०२४-२५मध्ये शेतकर्यांना दर्जे दार कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरीय गुणनियंत्रण निरीक्षक व भरारी पथकाच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी दरम्यान विविध कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर नियमभंग आढळल्यामुळे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले.


त्या सोबतच पुर्ण तपासणी करून विविध निविष्ठांचे नमुने काढणे, खत विक्री व्यवहार नोंदी, ज्यादा दराने खते विक्री, खतांची लिकिंग असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कृषी निविष्ठा विक्री कायदे व नियम नुसार कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. तपासणी दरम्यान, राहुरी, नेवासा आणि कोपरगाव तालुक्यांतील १२ कृषी सेवा केंद्रांमध्ये खतांची लिकिंग (संलग्न विक्री), जादा दराने खते विक्री, विक्री व्यवहार नोंदीतील त्रुटी आदी प्रकार निदर्शनास आले.


संबंधीत कृषी सेवा केंद्र चालकांना म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली. राहुरी तालुक्यातील तीन, नेवासा तालुक्यातील सहा तर कोपरगाव तालुक्यातील तीन अशा १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.