कत्तलीसाठी चालवीलेली जनावरे ताब्यात घेऊन कारवाई, एका जणावर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील जुने बसस्थानक परिसरात एका वाहनामध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेले गोवंशीय जनावरांची अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुटका करून एका इसमास ताब्यात घेतले असून त्याच्या कडून ७ लाख २० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २ मार्च २०२५ रोजी अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, अहिल्यानगर ते मनमाड रोडवर राहुरी येथील जुने बसस्थानक येथे एक इसम त्याच्या मालवाहु चारचाकी वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तल करण्या करीता निर्दयतेने डांबुन ठेवुन, वाहनामधुन वाहतुक करत आहे.
तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष राहुरीच्या जुने बसस्थानक येथे जाऊन संशयीत वाहनाचा शोध घेऊन, वाहनामध्ये गोवंशीय जातीचे जनावरे निर्दयतेने डांबुन ठेवल्याचे दिसल्याने संशयीत इसम रियाज रज्जाक सय्यद, वय २५ वर्षे, रा. क्रांतीचौक, राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष आरोपीच्या वाहनामधील गोवंशीय जनावराबाबत विचारपूस केली असता त्याने गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेबाबत माहिती सांगीतली.
पथकाने आरोपीकडून १ लाख २० रुपये किमंतीच्या गोवंशीय जातीचे ३ गायी व १ गोर्हा तसेच ६ लाख रुपये किमंतीचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो क्र. एमएच- १२ केपी ६६८८ असा एकुण ७ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यातील आरोपी विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं १९४/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम ५ (अ) सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उप विभागीय पोलीस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पो. नि. दिनेश आहेर, तपास पथकातील पोलीस अंमलदार अशोक लिपणे, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे या पथकाने कारवाई केली आहे.
