Type Here to Get Search Results !

राहुरी - बाथरुम मध्ये जाण्याच्या कारणावरुन मायलेकाला बेदम मारहाण.

 बाथरुम मध्ये जाण्याच्या कारणावरुन मायलेकाला बेदम मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


बाथरुम मध्ये जाण्याच्या कारणावरुन आरोपीने मायलेकाला लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे दि. २ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 


जनाबाई दादासाहेब नलगे, वय ५४ वर्षे, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजे सुमारास आरोपी नितीन नलगे हा जनाबाई नलगे यांच्या घरामोरील बाथरुमध्ये जात होता. तेव्हा जनाबाई नलगे यांनी त्याला बाथरुम मध्ये जाण्यास मज्जाव केला. 


तेव्हा आरोपीने जनाबाई नलगे व त्यांची मुले अरविंद व अनिकेत यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच मी बाथरुम मध्ये जाणार, तुम्ही माझ्या नादी लागले तर तुम्हाला एक एकाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली.


घटनेनंतर जनाबाई दादासाहेब नलगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन आण्णासाहेब नलगे, रा. चिंचोली फाटा, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. १९६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.