नांदेड - मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने दुसऱ्यांदा चोरट्यांनी फोडले.
पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान.
Ao/कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकाने 2 मार्च च्या मध्यरात्री फोडण्यात आले. आज ३ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान शहरातील व्यापारी मैनुसेठ व बाबासेठ हे दुकान उघडण्यासाठी आले असतात त्यांना आपल्या दुकानाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. यानंतर कुंडलवाडी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर कुंडलवाडी पोलिसांच्या समक्ष दुकानात मैनुसेठ व बाबासेठ यांनी आपल्या दुकानातील चोरी झाल्याचे दिसून आले. कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटना स्थळी भेट दिली दोन्ही दुकानात काय चोरीला गेले याचा तपास कुंडलवाडी पोलिसांकडून सुरू असून मुख्य बाजार पेठेतील दोन दुकाने चोरट्याने फोडल्याने कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड

