Type Here to Get Search Results !

राहुरी - यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दादासाहेब तोडमल तर उपाध्यक्ष पदी वरून तनपुरे व अक्षय वराळे.

 यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दादासाहेब तोडमल तर उपाध्यक्ष पदी वरून तनपुरे व अक्षय वराळे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहराचे ग्राम दैवत श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट संचलित श्री खंडेराया यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी दादासाहेब तोडमल तर उपाध्यक्ष पदी वरून तनपुरे व अक्षय वराळे यांची एकमताने निवड करण्यात आली. 


यात्रा कमिटीची बैठक बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी शनी मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बापूसाहेब वराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्री खंडेराया यात्रा उत्सव रविवार दि. १३ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत यात्रा पार पडणार आहे. यात्रा कमिटीच्या खजिनदार पदी राजेंद्र शेळके, उप खजिनदार पदी अमोल तनपुरे, सचिव दीपक मेहेत्रे, सहसचिव आकाश येवले यांची निवड करण्यात आली. 


यावेळी बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, दिनकर पवार, संभाजीराजे तनपुरे, सुभाष वाराळे, राजेंद्र वाडेकर, राजेंद्र वराळे, हरिभाऊ उंडे, सदाशिव शेळके, प्रतीक तनपुरे, संदीप तमनर, रावसाहेब हरिश्चंद्र, दादासाहेब ठोकळे, दत्तात्रय येवले, शिवाजी डवले, सुनील भुजाडी, चंद्रकांत उंडे, नयन शिंगी, विजय डवले, विलास वराळे, दिलीप राका, बापूसाहेब वराळे, तुषार पवार, अमोल पवार, अमोल वराळे, अमोल उंडे, काशिनाथ वराळे, शिवाजी वराळे, गोरक्षनाथ चव्हाण, आयुब इनामदार, हरिभाऊ उंडे, अशोक वामन, गौराज  तनपुरे, कारभारी डवले, नितीन तनपुरे, रंगनाथ तनपुरे, नानासाहेब शिरसाट, सदाशिव शेळके, महेश कासार, सोन्याबापू जगधने, सुनील पवार, दीपक मेहत्रे, विक्रम भुजाडी, सचिन काशीद, पाराजी तनपुरे, कांतीलाल वराळे, विशाल बागडे, विठ्ठल तमनर, राजेंद्र शेळके, अल्ताफ शेख, प्रशांत जगधने, नवनीतशेठ दरक, किशोर राऊत, श्रेयस रासने, विशाल शेजुळ, चैतन्य तनपुरे, अशोक वराळे, वेदांत तनपुरे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित होते.


रविवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता श्री खंडेराया महाराज पूजा, सायंकाळी पाच वाजता बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम सोमवार दि. १४ सायंकाळी पाच वाजता नामवंत मल्लांच्या कुस्त्या (जुने बस्थानक, नांदूर रोड, बियाणी मळा), मंगळवार दि. १५ रोजी सकाळी ९ बैलगाडा शर्यत अशा प्रकारे यात्रा उत्सव संपन्न होणार आहे.