चार जणांकडून दोघा माय लेकाला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तुम्ही तूमच्या कोठे लपुन ठेवले, त्याने आमची मुलीला सोडुन तो दुस-या मुलीसोबत कोठे राहत आहे. असे म्हणून चार जणांनी मिळून दोघा माय लेकाला लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील केंद्र खुर्द येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी घडली.
मिरा विठठल जाधव, वय ५० वर्षे, रा. केंदळ खुर्द, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मिरा जाधव यांचा लहान मुलगा संदीप विठठल जाधव याचे ५ वर्षोंपुर्वी ब्राम्हणी येथील सुवर्णा माळी यांची मुलगी निकीता माळी हिचे सोबत झाले होते. परंतु लग्नानंतर निकीता ही सुमारे दोन वर्षापासुन सासरी नांदत नसुन ती तिचे माहेरी राहते. सुन निकीता हि नांदत नसल्याने मुलगा संदीप जाधव हा केंदळ खुर्द गावातील एका मुली सोबत कामा निमीत्त बाहेरगावी गेलेला आहे तेव्हा पासुन तो घरी आलेला नाही.
दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०.३० वा. सुमारास आरोपी मिरा जाधव यांच्या घरी गेले. आणि म्हणाले कि, तुमचा मुलगा संदीप कोठे आहे, तो केंदळ गावात आला आहे, त्याला तुम्ही कोठे लपुन ठेवले आहे. आमच्या मुलीला सोडुन तो दुसऱ्या मुलीसोबत कोठे राहत आहे. असे म्हणून आरोपींनी मिरा जाधव व त्यांचा मोठा मुलगा सागर यांना शिवीगाळ दमदाटी करुन लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही तूमचा मुलगा संदीप याला आमचे समोर घेवुन जर आले नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
घटने नंतर मिरा विठठल जाधव यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विजय लहु सुर्यवंशी, निखील विजय सुर्यवंशी, दोघे रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, तसेच दोन अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजि. नं. १८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
