Type Here to Get Search Results !

आंबेगाव - दिव्यांग तरुणाचा खूनाचा लागला छडा ; मंचर पोलिसांनी दोघांना केली अटक

 दिव्यांग तरुणाचा खूनाचा लागला छडा ; मंचर पोलिसांनी दोघांना केली अटक



मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महात्मा गांधी विद्यालय जवळ दि. २९/४/२०२५ रोजी लक्ष्मण किसनराव शेटे वय ७४ रा. शितकलवस्ती, मंचर, ता. आंबेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शितकलवस्ती मंचर येथिल लक्ष्मण शेटे यांचे जागेतील भाडेकरू गणेश रविंद्र सोनवणे वय २८ वर्षे रा. शितकलवस्ती, मंचर ता आंबेगाव जि पुणे याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने भोसकून खून केला असल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मंचर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता आहे. 


मंचर पोलिसांनी गुन्हयाचे तपासात तपास पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून अज्ञात आरोपींची शोध घेणेबाबत सांगितले असता गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक पुराव्याचे अनूषंगाने शोध घेत असताना सदरचा गुन्हा इसम नामे सिध्देश संतोष रेणके वय १९ वर्षे, रा. जुना बैलबाजार, बाणखेलेमळा, मंचर ता. आंबेगाव जि पुणे, व त्याचा मित्र विघ्नेश अशोक शेवाळे वय २० वर्षे रा. लांडेवाडी, ता. आंबेदोन्ही रा मंचर ता आंबेगाव जि पुणे यांनी केला असल्याचे समजल्याने त्या दोघांना गुन्हयाचे कामी ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.


सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख सो, मा अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे, सहा. फौजदार मांडवे, पोलीस हवालदार तानाजी हगवणे, पोलीस हवालदार संजय नाडेकर, पोलीस हवालदार राजेश नलावडे, पोलीस हवालदार शेखर भोईर, पोलीस अंमलदार सुनिल काठे, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार हनुमंत ढोबळे, पोलीस अंमलदार योगेश रोडे, पोलीस अंमलदार फिरोज मोमीन, पोलीस अंमलदार प्रदिप गर्जे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस आहेत अंमलदार लंके यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सनिल धनवे हे करीत