Type Here to Get Search Results !

पारनेर - पारनेर शहरात कृषी व जनविकास प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा असा पहिला" पारनेर भूषण पुरस्कार संपन्न







 पारनेर शहरात कृषी व जनविकास प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा असा पहिला" पारनेर भूषण पुरस्कार  संपन्न

महाराष्ट्र दिनी १ मे रोजी  आनंद लॉन्स पारनेर येथे हा पुरस्कार  गुणवंतांना अहिल्यानगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार लोकनेते निलेश लंके साहेब व मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुर्वक प्रदान करण्यात आला


पारनेर तालुक्यातील सर्वांत मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा "  पहिला पारनेर भूषण " पुरस्कार विविध क्षेत्रातील १८ व्यक्तींना जाहीर झाला होता  महाराष्ट्र दिनी गुरुवार दि. १ मे रोजी खा. निलेश लंके यांच्या हस्ते व राळेगण सिद्धीचे  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. सरपंच व श्री संत यादव बाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सदाशिव मापारी, ज्येष्ठ शिवसेना नेते श्री गुलाबराव नवले  व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. 

यामध्ये किर्तन, प्रवचन व समाज प्रबोधनकार हभप बजरंग महाराज आंधळे, आळंदी देवाची.ह.भ.प.  जोस्त्नाताई विनायक मुळे, कृषी क्षेत्रातील उत्कृष्ठ बाजार समिती पुरस्कार पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, आदर्श सरपंच सौ. ताराबाई दिनकर कदम, काळकुप  ग्रामपंचायत , सामाजिक कार्यातील पुरस्कार डॉ. सुनील कृष्णराव औटी पारनेर , रक्तदान व आरोग्य सेवा, पुरस्कार रमीज  राजे पारनेर, पारनेर तालुक्यातील उत्कृष्ठ महिला पत्रकार सौ. निलम सुरेश खोसे पाटील, समाजसेवा पुरस्कार भास्करराव बबन उंडे,

उत्कृष्ट वकृत्व स्पर्धा पुरस्कार अशोक शिंदे, पर्यटन व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आडवाटेच पारनेर ग्रुप, उत्कृहिला बचत गट संघटक सौ वैशाली अडसूळ  काळकुप  , दुग्ध व्यवसाय व समाजसेवा पुरस्कार श्री संदीप रोहकले भाळवणी , उत्कृष्ट शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार, शिव मावळे कृतज्ञता प्रतिष्ठान पारनेर , पारंपारिक कला लोकशाहीर.. दत्ता जाधव करंदीकर, महिला लोककला पुरस्कार मनीषा दीपक चव्हाण. टाकळी ढोकेश्वर , महिला बचतगट संघटक सौ.जयश्री अमोल पवार पोखरी , शिक्षण व समाज प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील दरोडी. या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींना जाहीर करण्यात आला होता.

 आनंद मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  या ठिकाणी लक्ष फाउंडेशन संचलित न्यू अर्पण व्हॅलेंटरी ब्लड सेंटर अहिल्यानगर यांच्या माध्यमातून व रमिज भैय्या राजे सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रेरणेतून समाजाशी बांधिलकी धरून या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते 

  तरी या अशा पहिल्याच  गुणगौरव सोहळ्यास पारनेर तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक अरुणराव आंधळे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आहे .