नागरीकांचे अडीअडचणींचे तात्काळ निराकरण होणेकामी मंचर पोलिसांनी जाहीर केला नवीन हेल्पलाइन नंबर
प्रतिनिधी - आंबेगाव
मंचर पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी नवीन हेल्पलाइन नंबर जाहीर केला असून या नंबर वर व्हाट्सअप देखील सुरू असून मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना काही अडचणी आहेत त्यांनी फोन करून किंवा व्हाट्सअप द्वारे समस्या अडचणी मांडल्यास त्याचे निराकरण करण्यात येणार असून नागरिकांनी या पुढील काळात ७७९८००३१०० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सो, महाराष्ट्र राज्य यांनी १००-दिवसांचा कृती आराखडा अनूषंगाने सुचविलेल्या मुदयांवर अंमलबजावणी दिनांक २२/०२/२०२५ पासुन सुरू असून नागरीकांचे अडीअडचणींचे तात्काळ निराकरण होणेकामी तसेच पोलीस स्टेशनचे कामकाजाचे सुलभिकरणकामी नागरीकांचे मदतीकरीता मंचर पोलीस स्टेशनला हेल्प लाईन नंबर ०२१३३-२२३१५९ हा ठेवण्यात आलेला आहे. परंतू या हेल्पलाईन नंबरवर दुसरा कॉल चालू असल्यामूळे नागरीकांना त्यांचे अडचणीचे वेळी पोलीस स्टेशनशी वेळेत संपर्क करता येत नाही त्याकरीता मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरीकांकरीता मंचर पोलीस स्टेशनने नविन हेल्प लाईन नंबर ७७९८००३१०० हा चालू केलेला असून सदर मोबाईलवर फोन करून नागरीक आपले अडचणी कळवू शकतात किंवा सदर मोबाईलचे व्हॉट्सअप चालू असून व्हॉट्सअपवर देखिल आपल्या तक्रारी पाठवू शकतात तसेच मंचर पोलीस स्टेशनचे नविन ईमेल आय डी नंबर mancharpolicestatio@gmail.com यावर देखील नागरीक आपल्या तक्रारी पाठवू शकतात असे श्री कंकाळ यांनी सांगितले.
