Type Here to Get Search Results !

राहुरी - अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सयाजी श्रीराम यांचा आ. कर्डिले यांच्या हस्ते सत्कार.


 

अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सयाजी श्रीराम यांचा आ. कर्डिले यांच्या हस्ते सत्कार.


पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार- आ. कर्डिले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


कुरणवाडी व १९ गाव पाणीपुरवठा योजना तसेच बारागाव नांदूर व १४ गाव पाणीपुरवठा योजना यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून योजना सुरळीत करणार असल्याचे आश्वासन दोन्ही योजनांच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिले.


कुरणवाडी पाणीपुरवठा योजना व बारागाव नांदूर पाणीपुरवठा योजना या दोन्ही योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध प्रश्नां बाबत आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन निवेदन दिले, यावेळी कर्डिले बोलत होते. याप्रसंगी कुरणवाडी योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सयाजी श्रीराम यांचा आ. कर्डिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी आ. कर्डिले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून राहुरी तालुक्यातील दोनही पाणीपुरवठा योजनांना निधीची गरज असून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यापूर्वीच मंत्री पाटील यांच्याकडे लेखी पत्र सादर करून दोन्ही ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामाचा अंदाजपत्रकीय अहवाल सादर करण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन कर्डिले यांनी यावेळी दिले. कुरणवाडी योजनेच्या अध्यक्ष पदी श्रीराम यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून योजना सुरळीत चालण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, माजी जि.प. सदस्य धनराज गाडे, कुरणवाडी योजनेचे नूतन अध्यक्ष सयाजी श्रीराम, माजी संचालक रविंद्र म्हसे, उत्तमराव आढाव, नारायण झावरे, विराज धसाळ, नितीन कल्हापुरे, विनीत धसाळ, बाबासाहेब गाढे, बापूसाहेब वाघ, आशिष बिडगर, शरद किनकर, मारुती नालकर, बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब गडधे, बाबासाहेब गडधे, आप्पासाहेब नेहे, विक्रम पेरणे, कुरणवाडी योजनेचे सचिव राजेंद्र मेहेत्रे, दिपक वाबळे, अर्जुन म्हसे, बारागाव योजनेचे कर्मचारी शौकत इनामदार आदी उपस्थित होते.