Type Here to Get Search Results !

राहुरी - सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणुक लढविणार- आ. कर्डिले.


 


सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणुक लढविणार- आ. कर्डिले.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणुक राहुरी तालुका विकास मंडळाच्या नावावर व पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतील सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी जाहीर केले. राहुरी येथे कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन बैठकीत आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांची मनोगत ऐकून घेतल्या नंतर आ. कर्डिले यांनीही सदर घोषणा केली.


आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, तनपुरे सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आहे. शेतकरी कामगार ऊस उत्पादक व्यापारी यांच्या दृष्टीने कारखाना सुरू होणे आवश्यक आहे. राज्यात व केंद्रात आपली सत्ता असून जिल्हा बँक देखील ताब्यात आहे. त्यामुळे कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक परिस्थिती आहे. विशेष म्हणजे भाजपा व समविचारी पक्ष व कार्यकर्ते यांची देखील कारखाना निवडणूक लढविण्याची मागणी आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक राहुरी तालुका विकास मंडळाच्या नावावर तसेच पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


यावेळी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष शामराव निमसे, दत्तात्रय ढूस, उत्तमराव म्हसे, महेश पाटील, रवींद्र म्हसे, भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, महेंद्र तांबे, आर आर तनपुरे, सत्यजित कदम, कारभारी डौले, विक्रम तांबे, ॲड. संदीप भोंगळ, नारायण धोंगडे, राजेंद्र उंडे, सुरेश थेवरकर, दत्तात्रय आढाव, सोपान गागरे, प्रफुल्ल शेळके, दादापाटील सोनवणे, सुरेश भुजाडी, तान्हाजी धसाळ, अमोल भनगडे, मधुकर पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.