ओहळ यांना लाकडी दांड्याने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
काहीएक कारण नसताना आरोपींनी प्रफुल्ल ओहळ व त्याच्या चुलत भावाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे दि. १७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटने बाबत दोघां जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रफुल्ल चंद्रभान ओहळ, वय २७ वर्षे, रा. गुहा, ता. राहुरी, या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०.३० वाजे सुमारास प्रफुल्ल ओहोळ व त्याचा चुलत भाऊ किरण ओहळ हे दोघे राहुरी येथील त्यांचे काम आटोपून ते त्यांच्या घरी गुहा येथे मोटारसायकलवर जात होते.
त्यावेळी गुहा कमानी जवळ असताना समोरुन एक चारचाकी कार आल्याने ओहळ यांनी त्यांची मोटारसायकल रोडचे बाजुला थांबवली. तेथे आरोपी आले व त्यांनी काहीएक कारण नसताना प्रफुल्ल ओहोळ व किरण ओहळ या दोघांना लाकडी दांड्याने मारहाण केली.
प्रफुल्ल चंद्रभान ओहळ या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शुभम ब्राम्हणे, अभिषेक सोनवणे, दोघे रा. गुहा, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ४२५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
