१५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्रीच्या दरम्यान अपहरण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील लाख परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तीच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले. ही घटना दि. २७ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटने बाबत अज्ञात इसमा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेतील १५ वर्षे २ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहुरी तालुक्यातील लाख परिसरात राहते. दि. २६ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी व तीच्या घरातील सर्वजण जेवण करुन झोपी गेले. त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजे दरम्यान पिडीत मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे दिसून आले.
नातेवाईकांनी पिडीत मुलीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणासाठी तीला पळवुन नेले. अशी खात्री झाल्या नंतर पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या अवस्थेत अज्ञात इसमा विरोधात गुन्हा रजि. नं. ४९५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
