Type Here to Get Search Results !

राहुरी - १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसात गुन्हा दाखल.




 १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, पोलिसात गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील सडे परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दि. २६ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटने बाबत अज्ञात इसमा विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला.


राहुरी तालुक्यातील सडे परिसरात १६ वर्षे ४ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तीच्या कुटुंबासह राहते. दि. २५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११ वाजे पासून पिडीत मुलगी बेपत्ता झाली. दि. २६ एप्रिल रोजी सदर घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी तीचा परिसरात शोध घेतला. मात्र ती कोठेही आढळून आली नाही. 


आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळून नेले. अशी नातेवाईकांची खात्री झाली. गौतम बाळासाहेब निकम, रा. पिंपळगाव माळवी, ता. जि. अहिल्यानगर यांचेवर नातेवाईकांचा संशय आहे. पिडीत मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 


त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ४९८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.