Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवसेना सभासद नोंदणीसाठी लाडक्या बहिणी अग्रेसर.


 शिवसेना सभासद नोंदणीसाठी लाडक्या बहिणी अग्रेसर.


सभासद नोंदणी अभियानास लाडक्या बहिणींचा उत्तम प्रतिसाद- गंगाधर सांगळे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख गंगाधर सांगळे

यांचे उपस्थितीत व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी विकास भाऊ काशीद व गोरक्षनाथ सिन्नरकर, शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख मुंबई, दादर येथील शैलाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद नोंदणी अभियान राहुरी शहरात दुसर्‍या दिवशी यशस्वीरित्या पार पडले.


अभियानास महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्ष मुख्य प्रवक्ते ना. एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुरी शहर शिवसेनेचे गोरक्षनाथ मेहेत्रे, संतोष सरोदे, अनिल भोसले, देविदास पाटील, रमेश यादव, महिला आघाडीच्या श्रुती रिंगे, मंगल पोपळघट व शिवसैनिक महिला आघाडी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.