Type Here to Get Search Results !

राहुरी - १० अल्पवयीन वाहनचालकांची राहुरी पोलिसांकडून धरपकड.


 


१० अल्पवयीन वाहनचालकांची राहुरी पोलिसांकडून धरपकड.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलिस पथकाने काल दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील शिवाजी चौक परिसरात केवळ १५ मिनिटांत १० अल्पवयीन मुले वाहन चालवताना पकडली. त्यानंतर पालकांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलींना दुचाकी वाहने चालविण्यासाठी देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.


शहरातील शिवाजी चौक परिसरात सायंकाळी ६ ते ६.१५ या वेळेत राहुरी पोलीस पथकाच्या वतीने वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना आढळली. या मुलांकडे वाहन परवाना असण्याचा प्रश्नच नव्हता, त्यामुळे त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली. पालकांकडून भविष्यात अल्पवयीन मुलांना वाहन देणार नाही, अशी लेखी हमी घेण्यात आली आणि त्यानंतरच गाड्या त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आल्या. 


राहुरी पोलीस पथकाच्या वतीने अशी मोहीम नियमितपणे राबवली जाणार आहे. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे असून, अनेक प्राणांतिक अपघातांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी मुलांचे वय पूर्ण होईपर्यंत आणि त्यांच्याकडे अधिकृत वाहन परवाना येईपर्यंत त्यांना गाडी चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीने करण्यात आले.