बुवासाहेब महाराज यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गेणुभाऊ तोडमल यांची निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी खुर्द येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बुवासाहेब महाराज यात्रा यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गेणू भाऊ तोडमल तर उपाध्यक्ष पदी भाऊ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणीत खजिनदार भाऊसाहेब शेडगे, सचिव साहेबराव मोरे तर सदस्य म्हणून निसारभाई शेख, राजू क्षीरसागर, ज्ञानदेव तोडमल, मारुती शेडगे, दिलीप आघाव, प्रदीप पवार, भीमराज गुंड, राम तोडमल, भरत धोत्रे, अमोल डोळस, दादा शेटे, गोरख ससाने, साहेबराव माळी, परशु डोळस, सोमनाथ भिसे, मच्छिंद्र पाटोळे, युवराज तोडमल, खोमणे आदींची निवड करण्यात आलेली आहे.
शुक्रवार दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी बुवासाहेब महाराजांची यात्रा संपन्न होणार आहे. शुक्रवारी सकाळी पुणतांबा इथून कावडीने आणलेल्या जलाने बुवासाहेब महाराजांचा जलाभिषेक करण्यात येणार असून परिसरातील भाविक भक्त महाराजांना यावेळी गोड प्रसाद करतात.
तसेच पारंपारिक वाद्याच्या गजरात छबिन्याची मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी शोभेच्या दारूची आतिशबाजी होणार आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता भव्य कुस्ती हंगामा होणार आहे. यात्रोत्सवात सर्व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे व भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा. असे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष गेणूभाऊ तोडमल व समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केलेले आहे.