Type Here to Get Search Results !

राहुरी - शेतीच्या वादातून आग लावल्याने प्रचंड नुकसान.

 शेतीच्या वादातून आग लावल्याने प्रचंड नुकसान.



आग लावून नुकसान करणाऱ्या पती पत्नीवर पोलिसात गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शेतीच्या वादातून दोघां पती पत्नीने वैशाली लांडगे यांच्या शेत जमिनीत आग लावून नुकसान केले. ही घटना राहुरी शहर हद्दीत दि. १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. या बाबत दोघां पती पत्नीवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


वैशाली बबन लांडगे, वय ४९ वर्षे, या राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातील आर. आर. तनपुरे इस्टेट, येथे राहत आहे. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, वैशाली लांडगे यांनी सन २०११ साली राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातील आर. आर. तनपुरे इस्टेट, येथील सर्वे नं. १३८/४/अ मध्ये ५७ गुंठे शेतजमिन ही रश्मी हेमंत वरशिंदकर यांचेकडुन खरेदी केली होती.


सदर शेत जमिनी शेजारी ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काशिनाथ वराळे यांची शेतजमिन आहे. लांडगे यांनी सदर शेत जमिन घेतल्या पासुन आरोपी नेहमी म्हणत असे की, सदर शेतजमिन ही आम्हाला घ्यायची होती. सदर शेतजमिन ही आमची वडीलोपार्जित आहे. तुम्हाला सदर जमिनीमध्ये आम्ही पिक काढु देणार नाही. असे म्हणून ते लांडगे यांना सतत त्रास देत असे. तसेच आरोपींचा आजुबाजु च्या शेतकऱ्यांना सुध्दा त्रास असल्याने त्याच्या विरुध्द कोणी तक्रार देत नाहीत. त्यांची सदर ठिकाणी दहशत आहे.


दि. १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान लांडगे यांच्या शेतीमध्ये आग लागुन शेतीतील झाडे झुडपे, व बोलवेल तसेच शेती उपयुक्त साधने जळून खाक होऊन नुकसान झाले आहे. त्यानंतर वैशाली बबन लांडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काशिनाथ वराळे व अनिता ज्ञानेश्वर वराळे, दोघे रा. माळी गल्ली, राहुरी, या पती पत्नीवर गुन्हा रजि. नं. ३८१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३२६ (एफ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.