मांदळेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) परिसरात मोठया प्रमाणात गावठाण व इतर वस्त्यावर पाणी टंचाई निर्माण झाली होती.त्यामूळे परिसरातील नागराकांना पाण्यासाठी पाण्याच्या टँकरची गरज होती.तसा प्रस्तावही येथील ग्रामपंचायतीने पंचायत समितीला दिला होता.त्यामूळे येथील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून पाण्याचा टँकर सुरू झाल्याचे सरपंच उज्वला आदक यांनी सांगितले. आंबेगावच्या पूर्वभागातील मांदळेवाडी हे तालुक्याचे शेवट्च्या टोकावरील गाव येथील शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.पाऊस चांगला पडला तर पिकेही जोमात येतात.पण पावसाने दांडी मारली तर मात्र शेतातील उत्पादन निम्याने घटते.तसे पाहिले तर पावसाने जर जोमदार हजेरी लावली तरी येथे दरवर्षी पाण्याच्या टँकर शिवाय पर्याय नाही.आता मार्च-एप्रिल महिन्यात सुरु झालेला पाण्याचा टँकर जवळ जवळ जून अखेर पर्यंत म्हणजे जोपर्यंत पाऊस जोरदार हजेरी लावत नाही तोपर्यंत ? पाण्याचा टँकर सुरू झाल्याने निधान जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.कारण हा भाग दुष्काळग्रस्त असला तरी दुग्धव्यवसाय मोठया प्रमाणात असल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.निधान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथे कायम स्वरूप पाणी योजना होणे महत्वाचे आहे. सध्या पाण्याच्या टॅकरच्या दोन तीन फेर्या सुरू असून नागरीकांना वेळेत पाणी मिळत असल्याचे सरपंच उज्वला आदक यांनी सांगितले.जर मे महिन्यात पाण्याची मागणी वाढली तर टँकरच्या फेर्या वाढवल्या जातील असेही सरपंच म्हणाले.
