Type Here to Get Search Results !

पारनेर - सामाजिक कार्यकर्ते रमीज राजे यांना राज्यस्तरीय 'पारनेर भूषण 'पुरस्कार जाहीर.

 सामाजिक कार्यकर्ते रमीज राजे यांना राज्यस्तरीय 'पारनेर भूषण 'पुरस्कार जाहीर.



पारनेर दि.२२ पारनेर प्रतिनिधी 

  गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप व कीर्तिवंत सोबत सदैव कौतुकाचा हात ' या संकल्पनेतून राज्यस्तरीय कार्यरत असलेल्या कृषी व जनविकास प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर राबवून सामाजिक कार्यात निस्वार्थीपणे योगदान देणारे पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमीज राजे यांना ' पारनेर भूषण 'पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खा. डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते व राळेगणसिद्धी चे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव मापारी व संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार अरुण आंधळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सायंकाळी चार वाजता पारनेर येथील आनंद मंगल कार्यालयात 'पारनेर भूषण' हा मानाचा पुरस्कार सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

  'रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ' हे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते रमीज राजे दरवर्षी रमीज राजे मित्रमंडळ माध्यमातून रक्तदान शिबिर राबवत असतात.या माध्यमातून अनेक गरजू व्यक्तींना मदत झाली आहे.गरजू व्यक्तीला रक्त व त्याचे घटक देणे किंवा त्यांचे रक्तदान करणे हा मानवतेचा महत्त्वाचा भाग आहे. रक्तदाता आणि रक्त घेणारा कोण आहे. हे महत्वाचे नाही. रक्तदाता भविष्यात रक्त घेणारा असू शकतो तसेच रक्त घेणारा जवळ्याचा भविष्यात निरोगी रक्तदाता देखील असू शकतो. म्हणून कोणत्याही अपेक्षे शिवाय रक्तदान करणे हि महान मानवता आणि जीवन रक्षक प्रक्रियेतील एक महत्वाचे अंग आहे. केवळ तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्राला रक्तदान करू नका कोणत्याही मानवासाठी स्वचेने रक्तदान करणे हि खरी मानवता आहे. त्या मुळे अनेकांचे जीव वाचवू शकते.