श्रीगोंदा तालुक्यातील भाजपा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहिर-
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यात भाजपा अंतर्गत श्रीगोंदा पूर्व मंडल (कोळगाव, मांडवगण,आढळगाव, जि.प.गट) श्रीगोंदा पश्चिम मंडल (काष्टी, बेलवंडी, येळपणे, जि.प.गट) व श्रीगोंदा मध्य मंडल (श्रीगोंदा शहर) अशी मंडल रचना करण्यात आली असून श्रीगोंदा पूर्व मंडलाच्या मंडलअध्यक्षपदी- डॉ. विक्रम भोसले (कसरे), श्रीगोंदा पश्चिम मंडलाच्या मंडलअध्यक्षपदी- श्री. अजित काकडे, व श्रीगोंदा मध्य मंडलाच्या अध्यक्षपदी- श्री धनराज कोथिंबीरे यांची भाजपा प्रदेश पातळीवरून अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष श्री.संदिप नागवडे यांनी दिली.
मंडल अध्यक्ष निवडण्यासाठी पक्षाकडून निरीक्षक नेमण्यात आले होते. त्यानुसार दि. ७ एप्रिल २०२५ रोजी निरीक्षकांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मत लक्षात घेऊन मंडलनिहाय प्रत्येकी ३ नावांची यादी तयार करून शिफारस प्रदेशाकडे पाठविण्यात आली होती. त्यानुसार वरीलप्रमाणे नावांची घोषणा करण्यात आली आहे.निवड झालेल्या सर्वांचेच मा.मंत्री श्री.बबनरावजी पाचपुते, आमदार श्री.विक्रमदादा पाचपुते, डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, ॲड.श्री.प्रतापसिंह पाचपुते यांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:०० वा. माऊली संपर्क कार्यालय,श्रीगोंदा येथे जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
तसेच उर्वरित पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते यांनाही भाजपा कार्यकारीणी मध्ये व तालुका व जिल्हा शासकिय समित्यांमध्ये स्थान देण्यात येणार असल्याचेही संदिप नागवडे म्हणाले.


