ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथे सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती या पवित्र काळामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समस्त ग्रामस्थ वाघाचा आखडा यांनी दिली.
या कीर्तन महोत्सवात हभप सोमनाथ महाराज माने, हभप उदय महाराज घोडके, हभप नवनाथ महाराज गीते, हभप ऋषीराज महाराज परांडेकर, हभप अशोक महाराज इदगे, हभप विकास महाराज हापसे यांचे कीर्तन सेवा आयोजित करण्यात आले आहे. दररोज होणाऱ्या कीर्तन सेवेनंतर महाप्रसादाच्या पंगतीचेही आयोजन करण्यात आले आहे.
दररोज होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सकाळी काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ व किर्तन सेवा तसेच महाप्रसादाची पंगत असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव करून काल्याचे किर्तन ह भ प भगवान महाराज मालपुरकर यांची कीर्तन सेवा होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी कीर्तन महोत्सवाचा व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
