सिन्नर पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व पोलीस पाटील यांची आढावा बैठक संपन्न.
मार्गदर्शक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड.
सिन्नर( प्रतिनिधी) सुरेश इंगळे.
येत्या रामनवमीनिमित्त तसेच आंबेडकर जयंती उत्सव व यात्रा महोत्सव असल्या कारणाने शहर व ग्रामीण भागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सिन्नर पोलीस प्रशासन काही उपाययोजना करत आहे, जसे की मिरवणुकीसाठी परवानगी घेणे, मार्गाची तपासणी करणे, आणि आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणे, यासाठी नासिक ग्रामीण जिल्हा घटक सिन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये असणाऱ्या सर्व गावाचे पोलीस पाटील, यांची एक आढावा बैठक सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी विशेष लक्ष ठेवणे , सोशल मीडियावर मिरवणुकी संदर्भात होणाऱ्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवले, आणि आवश्यक असल्यास उपाययोजना करणे. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचा वापर करणे, मिरवणुकीत सहभागी होणाऱ्याची नोंद करणे, जेणेकरून कोणते अनुचित घटना झाल्यास त्वरित कारवाई करता येईल. तसेच मिरवणुकीच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवणे, यात्रा आणि मिरवणुकीच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांना देखील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रोत्साहित करणे इत्यादी बाबीवर चर्चा करण्यात आली.
आणि विशेष म्हणजे नाशिक ग्रामीण जिल्हा घटकात सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील कार्यरत असलेले सर्व पोलीस पाटील यांनी यापूर्वी आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेल्या परिस्थितीत अचानक उद्धवलेल्या घटनेवेळी व लोकसभा विधानसभा निवडणूक 2014 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
तसेच विक्रम देशमाने (पोलीस अधीक्षक ग्रामीण नासिक) यांच्या स्वाक्षरी अंकित प्रशस्तीपत्र, सिन्नर ठाणे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या हस्ते प्रत्येकी देण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड सह ,पो. कॉन्स्टेबल अंकुश दराडे आणि पो. कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे यांची सुद्धा उपस्थिती होती.