४६ वर्षीय महिलेचा विनयभंग करून लाकडी दांड्याने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
घराजवळील जागेत मुरूम टाकण्यास मज्जाव केल्याने दोघा पती-पत्नींने एका ४६ वर्षीय महिलेला लाकडी दांडा व लाथा बुक्क्याने मारहाण करत विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली.
या घटनेतील ४६ वर्षे महिला राहुरी तालुक्यातील गुंजाळे परिसरात कुटुंबासह राहते. दि. ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजे दरम्यान पिडीत महिला घरी एकटीच असताना तेथे आरोपी आले आणि घरा जवळील जागेत मुरुम टाकत होते. तेव्हा पिडीत महिला आरोपींना म्हणाली की, आपला जागेचा वाद हा राहुरी कोर्टात चालु आहे. त्यामुळे तुम्ही येथे मुरुम टाकु नका.
असे म्हणालेचा राग आल्याने आरोपी पती पत्नीने पिडीत महिलेला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी पतीने पिडीत महिलेचा ब्लाऊज फाडुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच तुम्ही जर आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवे मारुन टाकु, अशी धमकी दिली.
पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी रभाजी विश्वनाथ खाडे व मंदा रभाजी खाडे, दोघे रा. गुंजाळे, ता. राहुरी, या पती पत्नीवर गुन्हा रजि. नं. ३८७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वाल्मीक पारधी हे करीत आहे.
