Type Here to Get Search Results !

राहुरी - दारू पाजली नाही म्हणून तरुणाला शिवीगाळ व दगडाने मारहाण.


 

दारू पाजली नाही म्हणून तरुणाला शिवीगाळ व दगडाने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे


दारू पाजली नाही म्हणून अक्षय मोठे या तरुणाला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करत जखमी केल्याची घटना दि. २६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी येथील हॉटेल मित्र प्रेम येथे घडली.


अक्षय सुनिल मोटे, वय २६ वर्षे, धंदा- ट्रान्सपोर्ट व्यवसाय, रा. गुंजाळे, ता. राहुरी, हा तरुण दि. २६ एप्रिल २०२५ रोजी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हॉटेल मित्रप्रेम येथे जेवण करण्यासाठी गेला. हॉटेल मित्रप्रेमचे समोर असणारे लोखंडी बाजेवर बसला असताना तेथे आरोपी सचिन नवले हा आला व मला म्हणाला की, तु मला दारु पाज.


तेव्हा अक्षय मोटे त्यास म्हणाला की, माझेकडे पैसे नसल्याने मी तुला दारु पाजु शकणार नाही. याचा त्यास राग आल्याने त्याने अक्षय याला शिवीगाळ केली आणि डोक्यात दगड मारुन जखमी केले. 


अक्षय सुनिल मोटे याच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन मारुती नवले, रा. गुंजाळे, ता. राहुरी, याच्यावर गुन्हा रजि. नं. ४९४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.