पत्रे ठोकण्याच्या कारणावरुन चुलता व पुतण्याला बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पत्रे ठोकण्याच्या कारणावरुन आरोपींनी चुलता व पुतण्याला शिवीगाळ करुन लाकडी दांडा, कुऱ्हाड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी शहरातील जोगेश्वरी आखाडा येथे दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
अप्पासाहेब गोरक्षनाथ गाडे, वय २९ वर्षे, रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २१ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अप्पासाहेब गाडे यांचे चुलते मच्छिंद्र गाडे व पांडुरग भोगळ यांचे वाद सुरु होते. त्यावेळी अप्पासाहेब गाडे त्यांना समजावुन सांगत असताना तेथे आरोपी आले.
तेव्हा आरोपींनी अप्पासाहेब गाडे व त्यांचे चलते मच्छिंद्र गाडे या दोघांना शिवीगाळ करुन लाकडी दांडा, कुऱ्हाड व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या नादी लागले तर तुम्हास जिवंत सोडणार नाही, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
अप्पासाहेब गोरक्षनाथ गाडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पांडुरंग दतात्रय भोंगळ, निखील राजेंद्र भोगळ, अश्विनी पांडुरंग भोगळ, मिठ्ठु राजेद्र भोंगळ, सर्व रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ४५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
