अमेझिंग अबॅकसमध्ये १०३ विद्यार्थ्यांचे यश
खा. नीलेश लंके यांच्या हस्ते बक्षिस वितरण
अहिल्यानगर : प्रतिनिधी
अमेझिंग अबॅकस- अहिल्यानगर यांच्या वतीने हॉटेल यश ग्रँड येथे अयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अबॅकस गणित स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. नगरसेवक योगीराज गाडे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण १०३ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, नागपूर, मुंबई तसेच भारताबाहेरील देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही दहा मिनिटांचा गणिताचा पेपर सोडवून सहभाग नोंदविला.
या समारंभाच्या यशस्वी आयोजनामध्ये अमेझिंग अबॅकसचे संचालक किरण बल्लाळ, अश्विनी बल्लाळ यांच्यासह श्री.पोटे, प्रतिक्षा भवर, जयश्री कांबळी, प्रज्ञा विभूती, डिंपल शर्मा, मीनल बल्लाळ, कांचन दंडाळे, श्रध्दा देशमुख, शिल्पा गतफने, ऐश्वर्या व धनश्री तोरडमल, सोहम गाली, दुर्वांक जाधव, ईशान बल्लाळ यांचे सहकार्य लाभले.
▪चौकट
अभिनव आणि शिक्षणवर्धक उपक्रमांना पाठींबा
गणित हा केवळ विषय नसून विचार करण्याची पध्दती आहे. वेगवान विचार, अचूक निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्याचे काम अबॅकससारख्या पध्दती करता असतात. ही शास्त्रशुध्द पध्दत विद्यार्थ्यांच्या दोन्ही मेंदूंचा समतोल विकास घडविते. भारताच्या प्राचीन वेदांपासून गणिताचा अभ्यास सुरू झाला आणि आज त्या परंपरेला जगभर मान्यता मिळत आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. अमॅझिंग अबॅकसच्या या उपक्रमातून केवळ विद्यार्थ्याना नव्हे तर पालकांनाही गणिताबद्दल आत्मविश्वास वाटतो, ही बाब खूप सकारात्मक आहे. अशा अभिनव आणि शिक्षणवर्धक उपक्रमांना माझा नेहमीच पाठींबा राहील.
खासदार नीलेश लंके
लोकसभा सदस्य
▪चौकट
अबॅकसचे मुळ प्राचीन वेदांमध्ये
अबॅकस ही गणिताची जुनी परंतू अत्यंत प्रभावी तंत्रशुध्द पध्दत असून तिचे मूळ प्राचीन भारताच्या वेदांमध्ये सापडते. वेदांमधून निर्माण झालेली वेदिक मॅथेमॅटिक्स ही संकल्पना आजही जगभरात अभ्यासली जाते. याच भारतीय गणिती परंपरेचा आधार घेत जगात विविध ठिकाणी गणित शिकविण्याच्या विविध पध्दती विकसित झाल्या आहेत, त्यात अबॅकसचा समावेश आहे.
▪फोटो ओळ
अमेझिंग अबॅकसमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
