Type Here to Get Search Results !

राहुरी - तमाशा संपल्यावर, गाडी फोडून तरूणास बेदम मारहाण.


 


तमाशा संपल्यावर, गाडी फोडून तरूणास बेदम मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


यात्रेतील तमाशा संपल्या नंतर मागील भांडणाच्या कारणावरून एका तरूणाची मोटारसायकल फोडून तरूणाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत धिंगाणा घालण्याचा प्रकार राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील यात्रेत घडला आहे.


बबलू संजय शिंदे, वय २३ वर्षे, रा. खेडले परमानंद, ता. नेवासा या तरूणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील यात्रा असल्याने बबलू शिंदे आणि त्याचा मित्र गणेश शिंदे, रा. पिंपरी, ता. राहुरी हे दोघे स्प्लेंडर मोटारसायकलवर ब्राम्हणी येथील यात्रेला गेले. तेव्हा त्यांनी एका ठिकाणी गाडी लावली. 


त्यानंतर रात्री ११.३० नंतर यात्रेतील तमाशा संपल्या नंतर ते दोघे आपली गाडी घेण्यासाठी आले असता त्या ठिकाणी पाच ते सहा जण उभे होते. तेव्हा ते म्हणाले कि, तुला जास्त झाले आहे का? आमच्या पोरांना दादागिरी करतो का? असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच हातातील लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच आरोपींनी बबलू शिंदे याची मोटारसायकल फोडून तिचे नुकसान केले.


बबलू शिंदे याच्या फिर्यादीवरून निखिल जाधव, राहुल जाधव, नंदू जाधव, सागर जाधव, सुभाष जाधव यांच्या विरूद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.