जुगार अड्यावर छापा, १५ जुगा-यांवर गुन्हा दाखल.
एलसीबीची धडक कारवाई, १५ जुगारी गजाआड, हजारो रुपयांची रोकड जप्त.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागात तिरट नावाचा जुगार पैशावर सुरू असल्याची माहिती अहिल्यानगरच्या एलसीबी पथकाला मिळाली असता एलसीबीने छापा टाकत २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
रविवारी दुपारी साडेचार वाजता प्रसादनगर भागात छबु शिंदे यांच्या राहत्या घराजवळ शेडनेट मध्ये पत्त्याचा तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. यावेळी या पथकाने २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
यामध्ये छबु नारायण शिंदे रा. प्रसादनगर, प्रफुल्ल चंद्रभान ओहोळ रा.गुहा ,रावसाहेब आसाराम लोंढे रा. प्रसादनगर, अमोल गोरख साळवे रा. प्रसादनगर, करीम अहमद शेख रा. देवळाली प्रवरा, गणेश साहेबराव लिहणार रा. प्रसादनगर,बशरद शंकर शेवंते रा. प्रसादनगर,जालिंदर बाजीराव रोकडे रा. प्रसादनगर, श्रीकांत भाऊसाहेब टिक्कल रा.चिंचवीहिरे, संदीप राजाराम गायकवाड रा. प्रसादनगर,सचिन प्रकाश उदावंत रा. प्रसादनगर व इतर दोन ते तीन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, विशाल तनपुरे, गणेश लोंढे आदींनी केली आहे.
