Type Here to Get Search Results !

राहुरी - २४ वर्षीय अविवाहित तरुणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू

 २४ वर्षीय अविवाहित तरुणाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहूरी तालुक्यातील डिग्रस येथिल रहीवाशी असलेला बेपत्ता असलेला २४ वर्षीय अविवाहित तरुण डिग्रस शिवारातील मुळानदी वरील केटीवेयर च्या पाण्यात पडून मयत झाल्याची घटना आज दि. ५ मे रोजी उघडकीस आली. 


सत्यवान रोहीदास भालेराव, वय २४ वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी हा तरुण काल दि. ४ मे रोजी सकाळी जनावरे चारण्यासाठी गेला होता. परंतू तो संध्याकाळी परत घरी न आल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरु केली. रात्रभर व सकाळी त्याचा परिसरात शोध घेतला.


दरम्यान डिग्रस बारागाव नांदूर रस्त्यावरील असलेल्या मुळा नदीवरील केटीवेअर पात्रातील एका डबक्यात सत्यवान याचा मृतदेह आढळून आल्याने गावकऱ्यांनी घटना स्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. 


या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सत्यवान रोहिदास भालेराव याच्या अपघाती निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.