Type Here to Get Search Results !

पारनेर - ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा सुरु करण्याचा संस्थेचा उद्देश सफल: सिताराम खिलारी

 ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा सुरु करण्याचा संस्थेचा उद्देश सफल: सिताराम खिलारी



ढोकेश्वर ची प्रियल झावरे जिल्हा गुणवत्ता यादीत


ढोकेश्वर विद्यालयाने मिळवले ज्ञानवर्धिनी परीक्षेत घवघवीत यश






अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर या संस्थेने गेल्या 20 वर्षांपूर्वी इ. 6 वी आणि इ. 7 वी साठी शिष्यवृत्तीपूर्व ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा सुरु करण्याचा उद्देश सफल झाला असे प्रतिपादन संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी सर तथा आण्णा यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर विद्यालयातील कु. प्रियल एकनाथ झावरे हिने इयत्ता सातवी मध्ये शिष्यवृत्तीपूर्व ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत 300 पैकी 290 गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला त्याबद्दल तिचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी सिताराम खिलारी सर बोलत होते.

   ते बोलताना पुढे म्हणाले की ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा इ 6 वी व इ 7 वी मध्ये पाया पक्का होतो आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना आठवी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत होतो. या प्रसंगी खिलारी सर यांनी प्रियल ला रोख 1000 रुपये बक्षीस दिले.

   ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रा. ह. दरे साहेब आपल्या मातोश्री श्रीम. भिवंराबाई हरिभाऊ दरे यांच्या स्मरणार्थ ₹1000 शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देतात. प्रियल यासाठी पात्र ठरली आहे.

      प्रियलला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक बाळासाहेब निवडुंगे (गणित),  निलम खिलारी (मराठी), सुरेखा ठाणगे (इंग्रजी), प्रिया डव्हणे (बुद्धिमत्ता), रवींद्र ज्योतिक (विज्ञान) या शिक्षकांनी  मार्गदर्शन केले.

     या  प्रसंगी प्राचार्य सुनिल वाव्हळ, पर्यवेक्षक बाळासाहेब खिलारी, प्रियल चे वडील एकनाथ झावरे सर, बाबासाहेब जाधव, अतुल सैद, माजी मुख्याध्यापक शिवाजी खामकर, मोरेश्वर घोरपडे, मॅनेजर अशोक वाळुंज, अनिल निवडुंगे, पवन कुटे, सोमनाथ होरणे, शालनताई निवडुंगे, सुशांत खेडकर, अभिषेक जेजुरकर इत्यादी शिक्षक आणि पालक उपस्थित होते.

  या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र दरे साहेब, उपाध्यक्ष मा. डॉ. विवेकजी भापकर, सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा. श्री. जयंतजी वाघ साहेब, खजिनदार मा. ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम व  संस्थेचे जेष्ठ विश्वस्त व माजी अध्यक्ष मा. नंदकुमारजी  झावरे पा., ज्येष्ठ विश्वस्त मा. जी. डी. खानदेशे साहेब, मा.  सिताराम अण्णा खिलारी सर गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ भाऊसाहेब खिलारी, टाकळी ढोकेश्वर परिसरातील पालक, विद्यार्थी  यांनी अभिनंदन केले.